Maharashtra State Board of Secondary & Higher Secondary Education Pune 411004
महाराष्ट्र राज्य मुक्त विद्यालय मंडळ, पुणे-४११००४
Official Website for Open Schooling
DOWNLOAD ENROLMENT CERTIFICATE - Click Here

ELIGIBLE CANDIDATES - Click Here

APPLICATION FOR EVALUATION OF MARCH/APRIL 2020 - Click Hereमहाराष्ट्र राज्य मुक्त विद्यालय मंडळ, पुणे
पार्श्वभूमी
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण १९८६ आणि त्या अनुषंगाने प्रसिद्ध करण्यात आलेल्या कृति आराखड्यामध्ये मुक्त शिक्षणावर भर देण्यात आलेला आहे. मुक्त शिक्षणाची गरज जगातील अनेक देशांनी ओळखली असून त्यांनी मुक्त शिक्षणाची कल्पना स्वीकारली आहे. केंद्र शासनाच्या मानव संसाधन विकास मंत्रालयाने राष्ट्रीय मुक्त शिक्षण संस्था (National Institute of Open Schooling– ही स्वतंत्र यंत्रणा निर्माण करून १९८९ मध्ये मुक्त शिक्षणाचा पाया घातला. समाजातील प्रत्येक घटकातील मूल शिकले पाहिजे याकरिता अनेक योजना शासनामार्फत राबविण्यात येत आहे. तरीही अनेक विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहत आहेत. तसेच दिव्यांग विद्यार्थी मुख्य प्रवाहातील औपचारिक शिक्षण घेण्यास असमर्थ आहेत. अतिप्रगत विद्यार्थ्यांना शिक्षणपलीकडे अनेक विषयांचे पर्याय उपलब्ध करून देणे गरजेचे आहे.
सद्यस्थितीत इयत्ता १ली ते १०वी पर्यंतच्या शैक्षणिक प्रवासात राज्यातील विद्यार्थांची विविध टप्प्यांवर गळती होत असल्याची बाब निदर्शनास आली आहे.त्यामध्ये मुलींच्या गळतीचे प्रमाणही लक्षणीय आहे.सदर वस्तुस्थितीचा साकल्याने विचार करून दिनांक १४ जुलै, २०१७ च्या शासन निर्णयाद्वारे महाराष्ट्र राज्य मुक्त विद्यालय मंडळाची स्थापना करण्यात आली. सदर शासन निर्णयामधील धोरणात अल्प सुधारणा करून दिनांक २१ डिसेंबर ,२०१८ रोजी सुधारित शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे.
या सुधारित शासन निर्णयामध्ये मुक्त विद्यालयाची उदिदष्टे, वैशिष्टे, प्रवेश पात्रता, विषययोजना, परीक्षा पध्दती व मूल्यमापन इ. बाबत निश्चिती करण्यात आली आहे. सद्यस्थितत या मुक्त विद्यालय मंडळामार्फत दोन स्तरावर विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाईल.(अ) प्राथमिक स्तर -इयत्ता ५वी, (ब) उच्च प्राथमिक स्तर – इयत्ता ८वी.

(अ) प्राथमिक स्तर - इयत्ता ५ वी (सर्वसाधारण व दिव्यांग विद्यार्थ्यांकरिता ) (वय १० वर्षे पूर्ण)

१. गट –अ – भाषा विषय योजना – यामध्ये एकूण ०७ भाषा विषयांचा समावेश असून त्यापैकि कोणत्याही दोन भाषा निवडणे आवश्यक राहील.
२. गट –ब – भाषेतर विषय – सदर गटात गणित व परिसर अभ्यास हे दोन विषय असून ते दोन्ही विषय विद्यार्थ्यांना अनिवार्य आहेत.
३. गट –क – कला विषय – यामध्ये दोन विषयांपैकी कोणताही एक विषय निवडणे आवश्यक आहे.
४. याप्रमाणे विद्यार्थ्यास एकूण पाच विषय निवडणे बंधनकारक राहील.
५. दिव्यांगांकरिता विषय योजना – गट –अ मधील एकूण ०७ भाषा विषयांपैकी एक दोन भाषा विषय निवडणे आवश्यक आहे. गट-ब- मधील एकूण दोन विषय व गट-क- मधील एकूण तीन विषय यापैकी कोणतेही तीन किंवा चार विषय निवडणे आवश्यक राहील.
६. याप्रमाणे विद्यर्थ्यास एकूण पाच विषय निवडणे बंधनकारक आहे.

(ब) उच्च प्राथमिक स्तर – इयत्ता ८ वी (सर्वसाधारण व दिव्यांग विद्यार्थ्यांकरिता ) (वय१३ वर्षे पूर्ण)

१. गट –अ – भाषा विषय योजना – यामध्ये एकूण ०७ भाषा विषयांचा समावेश असून त्यापैकि कोणत्याही दोन भाषा निवडणे आवश्यक राहील.
२. गट –ब – मधील गणित विषय अनिवार्य आहे.
३. गट –क – एकूण ०३ विषय, गट-ड मधील दोन विषय, व NSQF विषयामधील १४ विषय या विषयांपैकी कोणतेही ०२ विषय निवडणे अनिवार्य राहील.
४. याप्रमाणे विद्यार्थ्यास एकूण पाच विषय निवडणे बंधनकारक राहील.
५. दिव्यांगांकरिता विषय योजना – गट -अ मधील एकूण ०७ भाषा विषयांपैकी एक दोन भाषा विषय निवडणे आवश्यक आहे. गट – ब मधील एकूण ०४ विषय तसेच गट –क मधील काळाचे एकूण ०३ विषय व NSQF विषयामधील १४ विषयांचा समावेश आहे. गट-ब व गट-क मधील विषयांपैकी कोणतेही ०३व ०४ विषय निवडणे आवश्यक राहील.
६. याप्रमाणे विद्यर्थ्यास एकूण पाच विषय निवडणे बंधनकारक आहे.